धोनी ठरला यशस्वी कर्णधार

मोहाली येथील सामन्यात विजय मिळवून देणारा धोनी वनडेमध्ये दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. यापूर्वी अशा स्वरुपाची कामगिरी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केली होती. मात्र हा विक्रम त्याने माडीत काढला आहे. दुसरीकडे टीम इंडियाच्या विजयाने आयसीसी वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान मजबूत झाले आहे.

टीम इंडिया धोनीच्या नेतृत्वाखाली १३४ वनडे सामने खेळली. यामध्ये टीम इंडियाला ७७ सामन्यांत विजयश्री मिळाली, तर ४६ सामन्यांत संघाला अपयश आले. यापूर्वी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १४६ पैकी ७६ वनडे सामने जिंकले होते. त्यामुळे टीकाकार कितीही टीका करीत असले तरी धोनीने मात्र तोच टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध केले आहे.

मोहलीतील सामना जिंकून टीम इंडियाने आयसीसी वन डे क्रमवारीतील अव्वल स्थान मजबूत केले. इंग्लंडवरच्या विजयाने टीम इंडियाचे आता १२० गुण झाले आहेत. दुस-या स्थानी असलेल्या इंग्लंडचे ११७ गुण आहेत. आता ११३ गुणांसह आस्ट्रेलिया मात्र तिस-या क्रमांकावर फेकला गेला आहे.

Leave a Comment