कालव्यात आढळला बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह

लंडन: नववर्षाची पार्टी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह ओल्ड ट्रेफ़ोर्ड परिसरातील एका कालव्यात सापडला आहे. या विद्यार्थ्यावर कोणताही हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

सौविक पाल हा मूळचा बंगलोर येथील विद्यार्थी मँचेस्टर मेट्रो पॉलिटन विद्यापीठात शिक्षण घेत होता. नववर्षदिनी नाईट क्लबमध्ये मित्रांबरोबर पार्टीत सहभागी होऊन परतताना सौविक बेपत्ता झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून त्याचे वडील शंतनू पाल इंग्लंडला रवाना झाले आहेत.

बुधवारी त्याचा मृतदेह मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब जवळच्या कालव्यात सापडला. त्याच्या मृतदेहाच्या विश्लेषणावरून त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नसावा; असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

Leave a Comment