सोनाक्षी करणार श्रीदेवीची कॉपी

‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसापासून भलतीच फॉर्मात आहे. तिचे लागोपाठचे चार सिनेमे हिट ठरल्याने तिची तुलना आता बॉलीवूडमधील सध्या स्टार नायिकेसोबत केली जात आहे. आता पर्यंत अभिनय करीत असताना तिने कुठल्याही नायिकेची कॉपी केली नव्हती. मात्र आगामी काळात येत असलेल्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमातील एका आयटम सॉंगमध्ये ती अभिनेत्री परवीन बाबी आणि श्रीदेवी यांची कॉपी करताना दिसणार आहे.

‘हिम्मतवाला’ या सिनेमासाठी सोनाक्षीचा हा लूक थोडासा हटके असणार आहे. ती या आयटम सॉंगसाठी १९८० साली प्रसिद्ध असलेली चमड्याची पँट आणि भडक कपडे घालणार आहे. सोनाक्षीचा हा लूक मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे. याबाबत बोलताना सोनाक्षी म्हणाली, ‘ या सिनेमातील वेगळा लूक मला खूप आवडला आहे. मनीषने या लूकसाठी खूप मेहनत घेतली आहे. या गाण्यासाठी मला परवीन बाबी आणि श्रीदेवी यांच्या गाण्याचे व्हिडिओ पाहवे लागले. त्यानंतरच मी हे शूट पूर्ण केले.’

‘हिम्मतवाला’ हा सिनेमा १९८३ मध्ये रिलीज झालेल्या आणि जितेंद्र-श्रीदेवीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिम्मतवाला’ या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तमन्ना यांची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा येत्या २९ मार्च रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाक्षीने एक आयटम सॉंग केले आहे. त्यामुळे या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment