केबीसी संपविताना ‘शहनशहा’ला आले भरून

मुंबई: कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या ६ व्या सत्रातील अखेरच्या भागाचे चित्रिकरण संपविताना ‘बॉलीवूडच्या शहनशहा’ला अक्षरश: भरून आले. आपल्या भावना अमिताभ बच्चन यांनी ‘फेसबुक’द्वारे व्यक्त केल्या.

सन २००० पासून सुरू झालेल्या केबीसी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ करीत आहेत. त्यांचा भारदस्त आवाज आणि स्पर्धकांना प्रोत्साहित करण्याची वृत्ती; यावर केबीसीच्या लाखो प्रेक्षकांनी प्रेम केले. केबीसी-६ चा अंतिम भागाचे प्रदर्शन दि. २६ जानेवारी रोजी होणार आहे.

या कार्यक्रमातील सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांनी आपल्यावर उदंड प्रेम केल्याबद्दल अमिताभ यांनी त्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम संपविताना आपल्या मनात असलेल्या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे; असे सांगतानाच अमिताभ यांनी आपण पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊ; अशी ग्वाहीही दिली.

Leave a Comment