इंग्लंडने केला कसून सराव

भारत व इंग्लंडमधील वनडे मालिकेतील चौथा सामना बुधवारी मोहालीत होत आहे. सध्या टीम इंडिया या मालिकेत २-१ ने पुढे आहे. त्यामुळे या मालिकेत परतन्यासाठी इंग्लंड संघाने मंगळवारी मोहालीत मैदानावर कसून सराव केला. गेल्या काही दिवसपासून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे मोहालीत लख्ख सुर्यप्रकाश पडताच इंग्लिश खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजी जोरदार सराव केला. या सामन्यात विजय मिळवून वनडे क्रमवारीतील अव्वलस्थान व मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

त्यासोबतच मोहलीतील हा सामना जिंकून मालिका विजय मिळवण्याचा निर्धार टीम इंडियाने केला आहे. मोहालीतील मैदान टीम इंडियासाठी लकी राहिले आहे. हा सामना जिंकून तेथेच मालिका खिशात घालण्याचा चंग बांधला आहे. युवराजसिंगचे हे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागले आहे. गेल्या दोन-तीन सामन्यात तो चांगल्या लयीत असल्याचे दिसून आले होते. मात्र त्याला मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयश आले आहे. या ठिकाणी त्याला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. या सामन्यात युवराजसिंग मागील कसर भरुन काढेल व भारताला विजयासह मालिका जिंकून देईल, अशी भारतीय रसिकांना विश्वास आहे.

या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याने या सामन्याकडे आतापासूनच सर्व क्रीडाप्रेमीचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment