यंदाच्या टॉप बॅचलरच्या यादीत प्रिन्स हॅरीचा समावेश

लंडन – यंदाच्या वर्षात म्हणजे २०१३ मध्ये टॉप बॅचलर म्हणजेच सर्वाधिक पसंती असलेला वर या यादीत लंडनच्या रॉयल फॅमिलीतील प्रिन्सेस डायना आणि चार्लस यांचा दुसरा मुलगा हॅरीची निवड झाली आहे. लाईफ स्टाईल मासिकाने केलेल्या सर्वेक्षणातनुसार ३९ प्रसिद्ध व्यक्तींत हॅरीचा समावेश असून अन्य व्यक्तीत जॉर्ज क्लुनी, केनेडी ज्युनिअर यांचाही समावेश आहे.

देशाचा सर्वात इलिजिबल बॅचलर म्हणून हॅरीची निवड झाली आहे खरी पण योग्य वरासाठी आवश्यक मानले जाणारे किती गुण त्याच्यात खरोखरच आहेत याचा खुलासा करण्यात आलेला नाही. आपल्या वागणुकीने अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या हॅरीला वाईल्ड कार्ड रॉयल असे संबोधण्यात आले आहे. हॅरीची वादग्रस्त वागणूक हा त्याच्या चार्मचाच एक भाग आहे असे मते देणार्यां चे म्हणणे आहे.

हॅरी खोडकर आहे, तो जरा जादाच ड्रींक्स घेतो, त्याला अनेक मैत्रिणी आहेत, तो कुठेही गर्दीत हिंडतो, चुकीच्या वेळी घरी जातो आणि हे सगळे आहे म्हणून तो आम्हाला अधिक आवडतो असे तरूणींचे म्हणणे आहे. तो विद्यापीठात गेलेला नाही, तो खूप बुद्धीमानही नाही तरीही तो भाऊ विल्यम्सपेक्षा अधिक कूल आणि जादा अपिलिं आहे असेही या लग्नाळू कन्यकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment