मनोज वाजपेयी होणार निर्माता

बॉलीवुडमध्ये गेल्या दोन दशकापासून सक्रिय असलेला व राष्ट्रीय पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी सध्या सिनेनिर्मिती क्षेत्रात लवकरच उतरणार आहे. येत्या काळात सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरून नवीन काही तरी करण्याचा तिचा मानस आहे. सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरल्यानंतर आजपर्यतच्या अनुभावाचा कस लागणार आहे.

याबाबत बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला की; आगामी काळात मी सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरण्याचा विचार गेल्या काही दिवसपासून करीत आहे. या सिनेनिर्मिती क्षेत्रात उतरून मला वेगळे काही तरी करायचे आहे. आतापर्यंत सिनेमात काम करीत असताना मला खूप अनुभव मिळाला आहे. त्यामुळे मला सिनेनिर्मिती क्षेत्रात नवीन काही तरी करता येणार आहे.

‘सत्या’ या सिनेमाच्या यशामुळे त्याचे करियर झळकले. या सिनेमामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला या सिनेमानंतर ‘कौन?’, ‘शूल’ आणि चंद्रप्रकाश द्विवेदीचा ‘पिंजर’ या सिनेमात देखील त्याने चांगली भूमिका केली. या भूमिकेमुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याशिवाय त्याने ‘राजनीति’, ‘चक्रव्यूह’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ मध्ये काम केले आहे.

Leave a Comment