सायनाचे आव्हान संपुष्टात

क्वालालंपूरः कोरिया पाठोपाठ मलेशियामध्येही भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिला चीनची भिंत भेदण्यास अपयश आले. मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिला चीनच्या यिंग ताई हिच्याकडून पराभूत व्हावे लागले.

जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या ताईने सायनाला सरळ दोन सेटमध्ये २२-२० आणि २१-१४ असे पराभूत केले. दोन्ही सेटमध्ये ताईने आक्रमक खेळ केला; तर सायनाने अनेक चुक करून आघाडी भरून काढण्याची संधी गमाविली.

या पराभवाने सायनाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Leave a Comment