बॉलिवुडचा दबंग सलमान खान पुन्हा एकदा चेह-यावरील नसाच्या आजाराने ( फेशल वेंस डिसऑर्डर) त्रस्त आहे. ‘ट्राइजेमिनल न्यूरॉल्जिया’ नावाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सलमान पुन्हा अमेरिकेला जाणार आहे. या आजारामुळे त्याचा चेहरा पुन्हा दुखत आहे. ज्यामुळे त्याला जेवण करताना आणि बोलताना खूप त्रास होतो. चेह-यावरील नसाच्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी यापूर्वी देखील सलमान एकदा अमेरिकाला जाऊन आला आहे.
अमेरिकामध्ये सलमानच्या या आजारावर २०११ साली ऑपरेशन झाले होते. ऑगस्त २०११ मध्ये सलमानचे हे ऑपरेशन झाले होते. हे ओपेरेशन पाच तास चालले होते. त्यानंतर डॉक्टरनी त्याला एक्शन सीन न करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरानी त्यावेळीच एक्शन सीन केल्यानंतर हा आजार पुन्हा येऊ शकतो याची कल्पना दिली होती. डॉक्टरचा सल्ला न मानल्याने हा आजार पुन्हा झाला आहे.
दरम्यान उपचारासाठी सलमान अमेरिकाला जाणार असल्याची माहिती त्याचा लहन भाऊ सोहेल खानने मीडियाला दिली. मात्र सलमान खान उपचारासाठी अमेरिकाला कधी जाणार आहे. हे अजून निश्चित ठरले नाही. एवढे मात्र नक्की आहे की, पूर्वी ज्या ठिकानी त्यांनी उपचार घेतला हे. त्या हॉस्पिटलमध्येच तो उपचार घेणार आहे.