
मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य पोलिसांना नाही काय; असा सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.

मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य पोलिसांना नाही काय; असा सवाल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे.
मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागातील पोलीस निरिक्षक सुजाता पाटील यांनी आपल्या ‘आझाद मैदान’ या कवितेत दंगेखोरांवर कठोर टीका केली आहे. ‘अमर जवान ज्योती स्मारकाची नासधूस करणारे हात कलम केले पाहिजेत;’ असे या कवितेत नमूद केले असून त्या प्रसंगी पोलिसांनी गोळीबार करायला हवा होता; असेही त्यात म्हटले आहे.
ही कविता मुंबई पोलिसांच्या ‘संवाद’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र पुढच्याच अंकात ही कविता ‘अनावधानाने’ प्रसिद्ध झाली; असा खुलासा करून त्याबद्दल माफीही मागण्यात आली. याबाबत मुंबई पोलीस आणि गृह विभागावर ठाकरे यांनी टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बंद पाळण्यास विरोध व्यक्त करणारी टिपण्णी करणार्या आणि तिला सहमती व्यक्त करणार्या पालघरच्या युवतींना असलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य पोलीस निरिक्षक सुजाता पाटील यांना का नाही; असा ठाकरे यांचा सवाल आहे.