‘रेस’ सोडून अनिल कपूर टोरंटोमध्ये

अनिल कपूर बॉलीवुडचा असा अभिनेता आहे की त्याची ओळख देशातच नव्हे तर विदेशात देखील आहे. तो त्याच्या अभिनयासाठी बॉलीवुडपासून ते हॉलीवुडपर्यंत प्रसिद्ध आहे. टोरंटो येथे होणा-या इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलचे अभिनेता अनिल कपूरला नुकतेच आमंत्रण देण्यात आले आहे. तो पहिला इंडियन आभिनेता आहे त्याला या फिल्म फेस्टिवलचे निमंत्रण मिळाले आहे. त्यासाठी आता तो टोरंटोला जाणार आहे, त्यासाठी त्याला ‘रेस’ या सिनेमाचे प्रमोशनचे काम अर्ध्यावर सोडावे लागले आहे.

सूत्राने दिलॆल्या महितीनुसार अनिल कपूर या अकेडमीच्या अवॉर्ड्सच्या एका सेगमेंटमध्ये भाग घेणार आहे. स्लमडॉग मिलनेयरनंतर त्याला हॉलीवुडचा प्रमुख चेहरा मानला जातो. या अवॉर्ड्सवेळी अनिल कपूर त्याच्या सिनेमाबाबत २० मिनीट चर्चा करणार आहे. हा इवेंट २१ जानेवरी रोजी होणार आहे. अनिल कपूर सध्या त्याच्या आगामी काळात येत असलेल्या ‘ रेस-२’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीजी आहे. त्याचा हा बहुचर्चित सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे.

याबाबत बोलताना अनिल कपूर म्हणाला,’ मला टोरंटो इंटनेशनल फिल्म फेस्टिवलचे आमंत्रन मिळाले आहे. त्यासाठी मी लवकरच जाणार आहे. या इवेंटचे निमंत्रण मिळाल्यामुळे मी सध्या खुश आहे.’ अनिल कपूर सध्या ‘रेस-२’ या सिनेमात काम करीत असून तो सैफ अली खानच्या ‘रेस’ या सिनामाचा सीक्वल आहे. या सिनेमात अनिल कपूर सोबतच सैफ अली खान, अमीषा पटेल, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम सुद्धा सहभागी होणार आहे.

Leave a Comment