इंग्‍लंडची खराब सुरुवात

रांची येथील तिस-या वनडे सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय टीम इंडियाच्या गोलदाजनी सार्थ ठरविला असून इंग्लंडची सलामीची फळी कापली आहे. टीम इंडियाच्या भेदक मा-यामुळे शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने २२ षटकात ३ गडी बाद ९० धावा केल्या होत्या. एलिस्‍टर कुक, केविन पीटरसन, इयन बेल हे तीघे बाद झाले आहेत.

इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. जलदगती गोलंदाज शमी अहमदने कुकला १७ धावांवर पायचित केले. अक्रॉस खेळण्‍याच्‍या प्रयत्‍नात तो बाद झाला. एलिस्‍टर कुक बाद झाल्‍यानंतर डाव सावरणारी केविन पीटरसन आणि इयन बेल ही जोडी लगेचच तंबूत परतली आहे. त्यामुळे इंग्‍लंडचा संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. पाठोपाठ दोन धक्‍के बसल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. इशांत शर्माने सर्वप्रथम पीटरसनला बाद केले. धोनीने त्‍याचा १७ धावांवर झेल घेतला.त्‍यानंतर पुढच्‍याच षटकात भुवनेश्‍वर कुमारने इयन बेलला बाद केले. कट करण्‍याच्‍या प्रयत्‍नात चेंडू बेलच्‍या बॅटची कड घेऊन धोनीच्‍या हातात गेला. बेलने २५ धावा काढल्‍या.

केविन पीटरसन आणि इयन बेलही जोडी स्थिरावली होती. मात्र ते बाद झाल्याने इंग्लंडचा संघ काहीसा संकटात सापडला आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी कोची येथे खेळलेलाच संघ आज मैदानात उतरविल आहे. तर इंग्‍लंडच्‍या संघात टीम ब्रेस्‍नन परतला असून ख्रिस वोक्‍सला बाहेर ठेवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने २२ षटकात ३ गडी बाद ९० धावा केल्या होत्या.

Leave a Comment