नवी दिल्ली दि. १७- जपानपाठोपाठ भारतीय आंतरराष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियानेही त्याच्या ताफ्यातील सर्व सहा ड्रीममलायनर बोईंग ७८४ विमाने सेवेतून ताप्तुरती बाहेर केली आहेत. यूएस फेडरल अॅव्हिएशन अॅथॉरिटीने या विमानांच्या सुरक्षेबाबत तपास सुरू केल्यानंतर या विमानांची सेवा थांबविली जावी असे आदेश दिले आहेत.
जपानमध्ये बुधवारी या विमानाच्या इंधनगळतीमुळे हे विमान तातडीने उतरविले गेले होते. इंधनगळतीमुळे आग लागण्याचा मोठाच धोका निर्माण झाला होता. तेव्हापासून या विमानांची सेवा थांबविली गेली आहे. आता या कंपनीला यूएस फेडरल अॅव्हीएशन समोर आपल्या विमानातील बॅटरी सुरक्षित असल्याचे सिद्ध करावे लागणार असून त्यानंतरच पुन्हा ही विमाने उड्डाण करू शकणार आहेत. ही विमाने वापरणारी युनायटेड एअरलाईन ही एकमेव अमेरिकन विमान सेवा कंपनी आहे. त्यांच्या ताफ्यातील सहा विमानेही त्यांनी सध्या बंद ठेवली आहेत.
या महिन्याच्या सुरवातीलाच या कंपनीने लॉस एंजेलिस ते टोकियो ही दररोज नॉनस्टॉप बोईंग ७८७ सेवा सुरू केली होती असेही समजते. एअर इंडियाने मात्र ही विमाने ताप्तुरती बंद ठेवण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आशियातील आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यात ड्रीमलायनरला पसंती देणार्याम विमान सेवेत एअर इंडियाचा समावेश आहे.