प्रेक्षकांना कॉमेडी सिनेमे आवडतात- मिथुन

आगामी काळात पहिला बंगाली भाषेतील कॉमेडी सिनेमा असलेल्या ‘व्हाइट मिसचीफ’ मधून अभिनेता मिथुन चक्रवती झळकणार आहे. काही दिवसापूर्वीच वेगवेगळ्या भूमिकेतून चर्चित आलेला अभिनेता मिथुन चक्रवर्तीला प्रेक्षक सुद्धा आता विनोदी रोल मध्ये स्वीकारू लागले आहेत. यापुवीच्या काळात याविरुद्धच्या भूमिका असलेल्या सिनेमात मिथुनने काम केले होते. मात्र आता त्याचे विनोदी काम प्रेक्षकाना पसंद पडत आहे.

काही दिवसापूर्वीच मिथुनने दिग्दर्शक उज्जवल चटर्जीच्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या ‘व्हाइट मिसचीफ’ सारखे विनोदी सिनेमे प्रेक्षकांना आवडू लागले आहेत. त्यामधील संवाद आणि हावभाव ‘मिथुन चक्रवर्ती स्टाइल’ मध्ये करण्यात आले आहेत. हा सिनेमा बांग्ला भाषेतील आहे.

याबाबत बोलताना मिथुन म्हणाला, ‘ हा सिनेमा केवळ मसालेदार अथवा मनोरंजन करणारा सिनेमा नाही. विभिन्न वर्गोंशी जोडलेला हा सिनेमा आहे. सध्या सर्वच प्रेक्षकाना कॉमेडी सिनेमे आवडतात. त्यामुळेच हा सिनेमा हिट होईल आशी अपेक्षा असून हा सिनेमा मल्टीप्लेक्स आणि एक पडदा असलेल्या सिनेमाघरात चांगले प्रदर्शन करतील अशी अपेक्षा आहे.’

Leave a Comment