सनी लियोनने सुधारली चूक

गेल्या काही दिवसापासून भारतीय वंशाची कनाडाई पोर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोन भलतीच फॉर्ममध्ये आहे. दिग्दर्शक एकता कपूर चा “रागिनी एमएमएस-२” चा सध्या वर्कशॉप सुरु आहे. यामधून सर्वाच सहभागी होणा-या कलाकारांना मार्गदर्शन मिळावे यासाठी या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सनी देखील सहभागी झाली होती. तिने सुद्धा कथेनुसार बारीक-सारीक गोष्टी यावेळी समजून घेतल्या.

विशेष म्हणजे पाहिल्याच दिवशी तिची अवस्था खराब झाली होती. सनी अशास्वरूपाच्या वर्कशॉपमध्ये पहिल्यादा सहभागी झाली होती. तिने याबाबतीत मीडियाला सुद्धा बोलताना खुपच नर्वस फील करीत असल्याचे तिने सांगितले होते. यामुळे लगेचच सनीच्या बाबतीतली नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे ती एक्टिंग कशी करणार याबाबत प्रश्न निर्माण झाला होता.

यासर्व गोष्टीचा परिणाम सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार सनीच्या सिनेमावर होणार होता. सनीच्या या प्रकारामुळे तिच्यावर निर्मातासुद्धा नाराज झाले होते. त्यानंतर सनीने मात्र चुकीची सुधारणा करीत आता टि्वट केले आहे की, वर्कशॉपमुळे तिला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. यामुळे निर्माताची नाराजी ओढावून घेत असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळेच सनी लियोनने चूक सुधारली असून यापुढे भविष्यात मीडियापुढे बोलताना मात्र ती विचार करूनच बोलणार आहे.

Leave a Comment