मृत जवानाच्या पोटात सापडलेला बॉम्ब ‘पाक’ बनावटीचा

रांची: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या पोटात सापडलेला बॉम्ब पाकिस्तानात बनलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. जम्मू काश्मिरप्रमाणेच देशाच्या मोठ्या भूप्रदेशात पसरलेल्या नक्षली दहशतवादाचे ‘पाक’ कनेक्शन यामुळे दिसून आले आहे.

झारखंडच्या लाटेहार जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आणि माओवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत सोमवारी १२ जवान मरण पावले. त्यापेकी काही मृतदेह बेपत्ता होते. त्यातील पाह मृतदेह सुरक्षा यंत्रणांनी राबविलेल्या शोध मोहिमेत सापडले. त्यापैकी एक जवान बाबूलाल पटेल याच्या देहाचे विच्छेदन करताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यात लोखंडसदृश धातूचा तुकडा दिसला. तो बाहेर काढल्यानंतर बॉम्ब असल्याचे निदर्शनास आल्याने स्फोटक तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी हा बॉम्ब निकामी केला. या मृतदेहाचे पोट फाडून त्यात हा बॉम्ब ठेऊन ते पुन्हा शिवले होते.

चकमकीत बळी पडलेल्या जवानांच्या शरिरात स्फोटके ठऊन घातपात घडवून आणण्याचे प्रकार यापूर्वीही माओवद्यांनी अनेकदा केले असून विशेषतः छत्तीसगड येथील अनेक जवान अशा स्फोटात बळी पडल्यची माहिती सीआरपीएफच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.