‘अजिंक्य’ चित्रपटाचे लवकरंच प्रदर्शन

2013 या वर्षाच्या जानेवारीत पहिल्यांदा रिलिज झालेल्या बीपी’(बालक-पालक) या चित्रपटाने सगळीकडे चांगलीच धमाल उडवून दिल्यानंतर आता या वर्षातला दुसरा महत्वाचा आणि चांगलाच चर्चेत असलेला ‘अजिंक्य’ हा मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 11 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

तेजस देऊस्कर या तरुण दिग्दर्शकाची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात खेळ आणि नातेसंबंध यावर भाष्य करण्यात आले आहे. अभिनेता संदिप कुलकर्णी आणि अभिनेत्री कादंबरी कदम यांच्या ह्यात मुख्य भूमिका असून पहिल्यांदाच ही जोडी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘अजिंक्य’ जोरदार प्रमोशन चालू असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. ‘अजिंक्य’च्या एकूण प्रमोशनकडे बघता, इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रमोशन केला जाणारा हा पहिलाच चित्रपट असावा.

नव्या वर्षाच्या सुरवातीलाच मराठी चित्रपटांसाठी ‘बीपी’च्या रूपाने इतक्या धडाक्यात सुरवात झाल्याने ‘अजिंक्य’ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.