शाहरुख-करणमध्ये ऑल इज नॉट वेल!

गेल्या काही वर्षापासून बॉलीवूडमध्ये अनेक हिट सिनेमे देणारा निर्माता करण जौहर आणि शाहरूख खानच्या जोडीची चर्चा खूप केली जात होती. मात्र आता यावेळेस चर्चा कोणत्या सिनेमावरून नाही तर त्यांच्यातील वादाची सुरु आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून करण व किंगखान यांच्यातील संबध खूप बिघडले आहेत. त्यामुळेच दोघेजण एकमेकाशी बोलत नसल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वीच शाहरूखने त्याच्या सर्व सहका-यासोबत दुबईमध्ये नवीन वर्ष साजरे केले. त्यानिमीत त्याने एक पार्टीदेखील दिली होती. शाहरूखने दुबईमध्ये आयोजित केलेल्या या न्यू ईयरच्या पार्टीसाठी करणला इनवाइट करण्यात आले होते. तरीपण करण त्या पार्टीला गेला नाही. करण यावेळेस दुबईमध्ये होता तरी पण तो या पार्टीकडे साधा फिरकला ही नाही.

गेल्या चार वर्षापासून किंगखान हा न्यू ईयर पार्टीचे आयोजन करीत आहे. मात्र यावर्षी पहिल्यदाच करण या पार्टीत सहभागी झाला नाही. यावेळेसच त्याने पार्टीमध्ये सहभागी होण्याची परंपरा मोडली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळी चर्चा ऐकावयास मिळत आहे. किंग खान आणि करणमध्ये काय मतभेद झाले आहेत हे समजत नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून दोघामध्ये ऑल इज नॉट वेल असेच वातावरण आहे.