
यंदाचे नवीन वर्ष म्हणजे २०१३ आय टी उद्योगासाठी २०१२ पेक्षा नक्कीच चांगले जाईल असे मत इन्फोसिसचे एक्झिक्युटिव्ह को चेअरमन एस. गोपालकृष्ण यांनी व्यक्त केले आहे. इन्फोसिस सायन्स फौंडेशनच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

यंदाचे नवीन वर्ष म्हणजे २०१३ आय टी उद्योगासाठी २०१२ पेक्षा नक्कीच चांगले जाईल असे मत इन्फोसिसचे एक्झिक्युटिव्ह को चेअरमन एस. गोपालकृष्ण यांनी व्यक्त केले आहे. इन्फोसिस सायन्स फौंडेशनच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
गोपालकृष्ण म्हणाले की जागतिक अर्थव्यवस्था व त्यातही प्रामुख्याने यूएसची अर्थव्यवस्था सुधारते आहे. चीनचा विकास तर वेगाने होत आहेच पण भारताच्या विकासाची गतीही चांगली आहे. युरोपशिवाय जगातील अन्य देश सध्या विकासाच्या मार्गावर आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले लक्षण आहे आणि म्हणूनच आयटी उद्योगासाठीही ही चांगली लक्षणे आहेत.
गोपालकृष्ण पुढे म्हणाले की या उद्योगात अनिश्चतता निश्चितच जाणवणार आहे हे खरे असले तरी प्रत्येक तिमाहीचवर त्यामुळे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. दररोजच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे त्यामुळे आयटीला चांगली संधी आहे. २००८च्या जागतिक मंदीनंतरही भारतात गेल्या पाच वर्षात आयटी उद्योग वाढलाच आहे. या उद्योगाने २५ टक्के निर्यातवाढही नोंदविली आहे. परिणामी इन्फोसिस, टीसीएस व विप्रो यासारख्या कंपन्या आजही गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राहिल्या आहेत.
रूपयाचे अवमूल्यन, कर्जदरातील व्याज दरवाढ, राजकीय परिस्थिती यामुळे २०१२ चे वर्ष थोडे अडचणीचे होते. मात्र तरीही दुसर्याक तिमाहीत इन्फोसिसचा फायदा २४.२९ टक्क्यांनी वाढून २३६९ कोटी रूपयांवर गेला होता. कंपनीने या वर्षात ९८५८ कोटी रूपयांचा महसूल मिळविला असून तिसर्याप तिमाहीचा अहवाल ११ जानेवारीला प्रसिद्ध केला जाणार आहे असेही ते म्हणाले.