
लंडन दि.४ – डॉटर ऑफ पाकिस्तान सन्मानाने गौरविल्या गेलेल्या चौदा वर्षीय मलाला युसुफझाई हिच्यावर जानेवारीत मेंदूच्या कवटीची शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केले आहे. शाळेच्या बसमधून जात असताना मलालाच्या डोक्यात तालिबानी बंदूकधार्यांनी गोळी घातली होती. त्यानंतर १५ आक्टोबरला तिला ब्रिटनचा क्विन एलिझाबेथ रूग्णालयात दाखल केले असून तेथेच तिच्यावर उपचार सुरू आहेत. जानेवारीच्या अखेरी मलालावर कॅनिअल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी केली जाणार असल्याचे रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डेव्ह रोसर यांनी सांगितले.
