रेल्वे प्रवास महागला

मुंबई: रेल्वेच्या तिकिटावर अधिभार आकारण्याचा राज्यशासनाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मान्य केला असून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच या अधिभारामुळे रेल्वेचा प्रवास काहीसा महागला आहे. दैनंदिन तिकिटाबरोबर मासिक पासच्या दरातही वाढ झाली आहे.

राज्य शासनाच्या प्रस्तावानुसार रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या तिकिटावर २ रुपये आणि प्रथम वर्गाच्या तिकिटावर ४ रुपये अधिभार लावण्यास मंजुरी दिली आहे. दुसऱ्या वर्गाच्या मासिक पासवर २० तर प्रथम वर्गाच्या पासवर ४० रुपये अधिभार आकारला जात आहे.

या अधिभारातील अर्धी रक्कम राज्य शासनाला मिळणार आहे. पहिल्या १० किलोमीटरच्या प्रवासाला मात्र कोणताही अधिभार आकाराला जाणार नाही.