रणबीर करणार आता आयटम सॉंग

यापूर्वी ‘चीलर पार्टी’ या सिनेमात रणबीर कपूरने आयटम सॉंग केले होते. आता त्याच प्रमाणे पुन्हा एकदा आयटम सॉंगवर थिरकण्याची रणबीर कपूरची इच्छा आहे. काही दिवसापूर्वीच रणबीर कपूर हा एका लहान मुलाच्या प्रोग्राममध्ये सहभागी झाला होता. यावेळी रणबीर म्हणाला की, मला जर चांगली ऑफर मिळाली तर मी येत्या काळात आयटम सॉंग करणार आहे.

कैंसर पेशंट असलेल्या लहान मुलासोबत क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी आलेला रणबीर म्हणाला, ‘ मी आगमी काळात करीत असलेल्या आयटम सॉंगला जर वरुण धवनची साथ मिळाली तर पूर्वीपेक्षा चागल्या पद्धतीने मला हे आयटम सॉंग सादर करत येईल. वरून हा चांगला डान्सर आहे. त्यामुळेच मला त्याची साथ आवशक वाटते. रणबीरला स्क्रीनवर वरुणचा डान्स आवडला. त्यामुळेच जर आगामी काळात संधी मिळाली तर मला त्याच्यासोबत थिरकन्यास आवडेल. मला वरून सोबत आयटम सॉंग करण्यास काहीच प्रॉब्लम नाही.’

गेल्या काही दिवसापासून रणबीर हा अभिनव कश्यपच्या ‘बेशर्म’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या सिनेमच्या प्रॉफिटमध्ये त्याने ७० टक्के शर्थ ठेवली आहे. त्यामुळे एका आयटम सॉंगसाठी रणबीर मानधन किती घेईल याची चर्चा सुरु आहे. त्यशिवाय रणबीरच्या आयटम सॉंगची इच्छा कधी पूर्ण होणार यासाठी अजून काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.

Leave a Comment