डान्स करताना रणवीर झाला जखमी

अभिनेता रणवीर सिंहला त्याचा जोशीला अंदाज चांगलाच महागात पडला आहे. आगामी काळात येत असलेल्या ‘लुटेरे’ या सिनेमाच्या एका गाण्याचे शूटिंग सुरु असताना रणवीरने जोशमध्ये डान्स केला. मात्र यामध्ये त्याचा सोबतच डान्सर जखमी झाला. त्या डान्सरचे डोके रणवीरच्या गालावर लागल्याने त्याचा गाल कट झाला आहे. त्या डान्सरच्या डोक्यात जखम झाली असल्याने दोघांना पण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे.

‘लुटेरे’ या सिनेमात रणवीर सोबत सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. या सिनेमाची शुटींग गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या सिनामातील रोल साठी रणवीरचा गेटअप आणि लुक बदलण्यात आला आहे. त्यासाठी रणवीरला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. त्यामुळेच त्याचा जखमी होण्याचा सिलसिला अजूनही कायम आहे.

प्रड्यूसरला हा सिनेमा रिलीज करण्याची गडबड झाली आहे. त्यातच रणवीर सारखा जखमी होत आहे. लवकरच तो यामधून बाहेर येईल असे सांगितले जात आहे. लवकरच तो जुन्या शेड्यूलनुसार सेटवर परतेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा लवकरच या सिनेमाची शूटिंग सुरु होणार आहे.ही वेळ रणवीरसाठी खूप कठिन आहे. यापूर्वी मार्च २०१२ मध्ये रणवीर ‘लुटेरे’ च्या शूटिंगवेळी जखमी झाला होता. त्यामुळे बराच काळ सिनेमाचे शुटींग रखडले होते.

Leave a Comment