नोकरीच्या आमीषाने दलित युवतीवर बलात्कार

हसन: कर्नाटकातील दलित युवतीला नोकरीचे आमीष दाखवून १० जणांनी सतत ९ दिवस बलात्कार करून निर्जन ठिकाणी सोडून दिले. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी ७ आरोपींना अटका केली आहे.

अलूर तालुक्यातील मग्गे या गावात राहणाऱ्या १७ वर्षीय गरीब युवतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी हसन येथे आणले. दर दिवशी तिला विविध ठिकाणी नेऊन दहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार नऊ दिवस करून गुरुवारी तिला निर्जन स्थळी सोडून आरोपी परागंदा झाले. निराधार अवस्थेत पडलेल्या या युवतीने एका स्वयंसेवी संस्थेचा आधार घेतला. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला धीर देऊन पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांना या युवतीकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली. या पथकांनी विविध ठिकाणी छापे घालून दहापैकी सात जणांना अटक केली आहे.

अशाच प्रकारे उत्तरप्रदेशातील सोनिपत येथे एका ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेला नोकरी देण्यच्य बहाण्याने बोलावून घेऊन स्टुडिओ चालविणारा छायाचित्रकार आणि त्याच्या ४ मित्रांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून सोनिपत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment