मेलबर्न: दिल्लीतील सामुहिक बलात्काराच्या अमानुष घटनेचे पडसाद भारताबरोबरच विदेशात उमटू लागले आहेत. जगभरातील भारतीयांनी या घटनेचा निषेध करून महिलांना संरक्षण देण्यासाठी कडक कायदे करण्याच्या मागणीला पाठींबा व्यक्त केला आहे.

ऑस्ट्रेलिया येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर ऑस्ट्रेलियास्थित भारतीयांनी सामुहिक बलात्काराच्या निषेधार्थ निदर्शने केली. भारतात बलात्कार आणि महिलांच्या छेडछाडीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होता असल्याबद्दल चिंता व्यक्त करून त्याविरोधात कडक कायदे करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी दूतावासाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले.
सामुहिक बलात्काराच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी आणि महिलांना संरक्षण देणारे कायदे कडक करावे; अशी मागणी करणारे हजारो भारतीय वंशाच्या थाई नागरिकांच्या सह्यांचे निवेदन बेंकोक येथून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठविण्यात आले.