मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू

अहमदाबाद दि.२०- गुजराथेतील मतदानानंतर विविध एक्झिट पोलनी वर्तविलेल्या अंदाजानुसार भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू असून राज्य भाजप युनिटने नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मागील दोन वेळच्या शपथविधीप्रमाणेच हा शपथविधीही अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्डेडियमवर होणार असून शपथविधीच्या निमंत्रणपत्रिका तयार करण्याचे काम गुजराथ प्रशासनाने सुरू केले आहे.

शपथविधीची तारीख २५ डिसेंबर निश्चत करण्यात आली आहे. हा दिवस माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे म्हणून ही तारीख सध्या निश्चत करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेवटची कॅबिनेट बैठक बुधवारी गांधीनगरमध्ये घेतली. त्यात कछ आणि सौराष्टाला वरदान ठरणार्याी नर्मदा वॉटर ग्रीड प्रोजेक्टचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचा निर्णय झाला असे समजते. याचवेळी मोदी यांनी जानेवारीच्या मध्यात व्हायब्रंट गुजराथ इन्व्हेस्टर समिट गुजराथेत होत असल्याचे ट्वीट केले आहे.

Leave a Comment