नोकियाचा वट घटला

हेलसिंकी: एकेकाळी मोबाईल फोन्सच्या बाजारपेठेवर राज्य करणारी नोकिया कंपनी स्पर्धेमुळे अडचणीत आली असून त्यामुळे फिनलंडसारखा साधन देशही अडचणीत आला आहे. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांची संख्या १० हजारांनी कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोन्सचा प्रसार होत असताना नोकियाने अधिक प्रगत आणि किफायतशीर फोन्सच्या विकसनाबाबत आवश्यक तत्परता न दाखविल्याने आर्थिक दृष्ट्या सधन ग्राहक सॅमसंग, ब्लॅकबेरी, आयटीसी, आयफोनकडे वळले; तर कमी उत्पन्न गटातील ग्राहक चायना फोन्स घेऊ लागले. त्यामुळे नोकियाचा बाजारपेठेतील ‘वट’ घटू लागला आहे.

फिनलंड या देशाच्या देशांतर्गत उत्पादनात तब्बल ४ टक्के वाटा एकट्या नोकियाचा होता. त्यामुळे कंपनी अडचणीत आल्यावर फ़िनलंड्च्या पंतप्रधानांनीही चिंता व्यक्त केली आहे. नोकिया एकट्या फ़िनलंडमधील कर्मचारी संख्या ४० टक्क्याने कमी करणार आहे. त्यामुळे ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. या कुशल कर्मचाऱ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फ़िनलंड सरकार काही योजना आखणार आहे.

निधी उभारणीसाठी कंपनीने आपल्या मुख्यालयाची इमारत विकण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment