न्यू टाऊन : एका प्राथमिक शाळेच्या दोन वर्गात माथेफिरूने केलेल्या गोळीबाराने २६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २० लहान मुले आहेत. हल्लेखोराने स्वत:वरही गोळीबार करून आत्महत्या केली.

न्यू टाऊन : एका प्राथमिक शाळेच्या दोन वर्गात माथेफिरूने केलेल्या गोळीबाराने २६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २० लहान मुले आहेत. हल्लेखोराने स्वत:वरही गोळीबार करून आत्महत्या केली.
न्यूटाऊन मधील एका प्राथमिक शाळेच्या दोन वर्गात माथेफिरूने पिस्तूल आणि अर्धस्वयंचलित रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ५ ते १० वर्ष वयोगटातील २० विद्यार्थ्यांसह २६ जण ठार झाले. गोळीबार सुरू असताना इतर विद्यार्थी वर्गात बाकाखाली लपून राहिले. गोळीबाराचे वृत्त पसरताच शेकडो पालकांनी शाळेच्या आवारात धाव घेतली.
गोळीबार करून आदम लांझा या हल्लेखोराने आत्महत्या केली. या प्रकारामुळे केवळ न्यू टाऊन नव्हे; तर संपूर्ण अमेरिकेत खळबळ माजली आहे.