मनिला: चीनच्या दक्षिण चीनी समुद्रातील दादागिरीला चाप लावण्यासाठी फिलिपिन्स सरकारने अमेरिकेला नौदल पाठविण्याची विनंती केली असून लवकरंच अमेरिकन नौदलाचे पथक फिलिपिन्स सागरी हद्दीत तैनात होण्याची शक्यता आहे.

दक्षिण चीनी सागरी भागात चीनने सुरू केलेल्या दादागिरीमुळे फिलिपिन्स, तैवान, व्हिएतनाम आणि भारत या देशांनी निषेध केला आहे.
या पार्श्वभूमीवर फिलिपिन्स आणि अमेरिका यांचे सामरिक आणि आर्थिक हितसंबध दृढ करण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि फिलिपिनो राजनैतिक अधिकाऱ्यांची बैठक मनिला येथे पार पडली. चीन दक्षिण चीनी सागरी भूभागावर अनाधिकाराने आपला हक्क सांगत आहे; याकडे अमेरिकन मुत्सद्द्यांचे लक्ष यावेळी वेधण्यात आले. वेळ पडल्यास दक्षिण चीनी समुद्रात भारतीय नौदल रवाना करू; असा इशारा भारताचे नौदल प्रमुख एडमिरल डी. के. जोशी यांनी नुकताच दिला आहे.
दुसरीकडे चीन कम्युनिस्ट पक्षाचे नवे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दक्षिण चीनी सागरी भागात एका युद्धनौकेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लढाईसाठी सज्ज राहा;’ असा इशारा चीनी नौदलाला दिला आहे.