गंभीर स्वार्थी खेळाडू: धोनीचा आरोप

मुंबई: टीम इंडियाच्या दारुण अपयशाच्या पार्श्वभूमीवर टीममधील आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. भारताचा युवा फलंदाज गौतम गंभीर हा स्वार्थी खेळाडू असल्याचा आरोप करून कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने त्याच्याविरुद्ध भारत क्रिकेट नियामक मंडळाकडे तक्रार केली आहे.

जर आर. अश्विनसारखा गोलंदाज असलेला नावाखा खेळाडू धावा करू शकतो तर गंभीरसारख्या शैलीदार फलंदाजाच्या धावा का होऊ शकत नाहीत; असा सवाल करून धोनी म्हणतो की; गंभीरला केवा आपले संघातील स्थान कायम ठेवण्यात रस आहे. आपल्यावर अपयशाचे खापर फुटू नये म्हणून तो स्वत: स्वान आणि पानेसर याच्यासारख्या धोकादायक गोलंदाजांचा सामना करण्याऐवजी तळाच्या फलंदाजांना पुढे करीत आहे.

गंभीरच्या हलगर्जीपणामुळेच कोलकाता कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासारखे महत्वाचे फलंदाज बाद झाल्याचा आरोपही धोनीने केला आहे. गंभीरमुळे संघाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्याने बीसीसीआय केली आहे.

Leave a Comment