एमसीए निवडणूक रिंगणात शरद पवार उतरणार?

मुंबई दि. ८ – आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रिय होण्याच्या विचारात असून मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या विचारात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी १० वर्षे एमसीएचे अध्यक्षपद भूषविले असून त्यानंतर विलासराव देशमुख हे या पदावर निवडून आले. मात्र केवळ वर्षातच ऑगस्टमध्ये देशमुख यांचे निधन झाले. पवार यांना मुंबई क्रिकेट प्रशासनात रस आहे आणि याविषयी बीसीसीआय आणि एमसीए पदाधिकार्यांरत चर्चाही सुरू आहे. एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष निरंजन शहा यांनीही याला दुजोरा दिला आहे. पवार पुन्हा अध्यक्षपदी आले तर एमसीए साठी ते लाभाचे होईल असे पवारांचे विश्वासू मुख्य प्रशासकीय अधिकारी सांगत आहेत.

मात्र पवार यांना ही निवडणूक लढवायची तर अनेकांशी सामना करावा लागणार आहे. देशमुखांविरोधात निवडणूक लढविलेले माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे हेही या निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचेही नाव चर्चेत असून त्यांना शहरातील पाच कलबचा पाठिंबाही आहे. देशमुखांच्या मृत्यूनंतर कार्यभार स्वीकारलेले रवी सावंतही या पदासाठी उत्सुक आहेत असे समजते.

Leave a Comment