किस सीन करताना इमरानची अडचण

आगामी काळात येत असलेला विशाल भारद्वाजचा `मटरू की बिजली का मन डोला’ हा सिनेमा सध्या इंडस्ट्रीजमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या सिनेमात अनुष्का आणि इमरानचे हॉट सीन असल्याची चर्चा आहे. सध्या इमरान आणि अनुष्काच्या ऑनस्क्रीन किसचा प्रोमों सगळीकडे दाखविला जात आहे. या सिनेमातील किस सीन करताना इमरानची मात्र खूपच अडचण झाली होती.

याबाबत बोलताना इमरान म्हणाला, ‘ अनुष्का सोबत कीस सीन करताना माझी चांगलीच पंचायत झाली. मला हा सीन करताना थोडेसे अनकॉम्पटेबल वाटत होते. माझी आणि अनुष्काची खूप ओळख नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीसोबत असे सीन करताना खूप अडचण होते. त्या सीनसाठी आम्हला खूपच रिटेक करावे लागले. त्यामुळे हा सीन करताना माझ्यासोबतच युनिटला देखील त्रास झाला. मात्र फायनली हा सीन पूर्ण झालल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.’

विशाल भारद्वाजच्या `मटरू की बिजली का मन डोला’ या सिनेमात अनुष्का शर्मा, इमरान खान, शबाना आजमी आणि पंकज कपूर लीड रोल करीत आहेत. त्यशिवाय एक खास करेक्टर या सिनेमात असून त्याचे नाव गुलाबो गाय आहे. या सिनेमात हे करेक्टर केवळ पंकज कपूरला दिसते असे दाखविण्यात आले आहे. हरियाणाच्या ग्रामीण भागावर आधारित असलेल्या या कॉमेडी सिनेमात अनुष्का हॉट रोल मध्ये दिसणार आहे. अनुष्का या सिनेमात पंकज कपूरच्या मुलीचा रोल करीत आहे.

Leave a Comment