गेल्या काही दिवसापासून किंग खान शाहरुख व प्रियंका चोप्रा यांच्या अफेयरबाबत चर्चा रंगली आहे. ब-याच दिवसापासून शाहरुख आणि प्रियंका यांच्याबाबत बोलीव्वोड मध्ये अफवा पसरल्या असल्या तरी यापूर्वी दोघांनी याबाबत कधीच खुलासा करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या एका इंटरव्यूमध्ये याबाबतचे शाहरुखने मौन सोडले असून त्यांनी मी आणि प्रियंका केवळ मित्रच असल्याचे सांगून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
याबाबत अधिक बोलताना शाहरुख म्हणाला की, ‘ प्रियांका व माझ्याबाबत गेल्या काही दिवसापासून पसरविलेल्या अफवा ऐकून मला खूपच वाइट वाटते. मी नेहमीच महिलाचा सन्मान करतो. मी त्यांची इज्जत करतो. तरी पण माझ्याबाबत अशा प्रकारच्या अफवा पसराविल्याने मला दुख झाला आहे. प्रियंका आणि माझी गेल्या काही दिवसापासून चांगली मैत्री आहे.’
मात्र यावेळेस बोलताना शाहरुखने प्रियंका ही खूप जवळची मैत्रीण असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांच्या या दोस्तीमुळे गेल्या काही दिवसापासून शाहरुखची पत्नी गौरी का नाराज आहे याचे उत्तर मात्र त्याने दिले नाही.