नवी दिल्ली: राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे भारत हा घोटाळे आणि झोपडपट्ट्यांचा देश बनला असून ही दुर्गती रोखण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग आहे; असे प्रतिपादन अध्यात्मिक गुरू आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे उद्गाते श्री श्री रविशंकर यांनी केले.

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि दिल्ली पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ध्यान प्रशिक्षण कार्यक्रमात रविशंकर बोलत होते.
सध्याच्या संसद सदस्यांपैकी २०० सदस्यांवर विविध गुन्हे दाखल असून मतपेट्याच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे देत आहेत असा आरोप रविशंकर यांनी केला. या परिस्थितीत भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार हा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
राजकीय नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थापेक्षा देशाचा अधिक विचार करणे आवश्यक असून नेत्यांमध्ये त्यागाची भावना निर्माण झाल्यास भारतीय लोकशाहीचा चेहरा मोहरा बदलू शकेल; अशी आशा त्यांनी व्यक्त केली.