लंडन: जाहिरातींचा अभाव आणि नागरिकांकडून घेतले जाणारे आक्षेप यामुळे ‘याहू’च्या ‘चॅट रूम्स’ बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

लंडन: जाहिरातींचा अभाव आणि नागरिकांकडून घेतले जाणारे आक्षेप यामुळे ‘याहू’च्या ‘चॅट रूम्स’ बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्स सुरू होण्यापूर्वी याहू या त्या काळातील लोकप्रिय वेबसाईट असलेल्या याहूने सन १९९५ मध्ये याहू मेसेंजर उपलब्ध करून दिला. त्याबरोबरच अनेक चॅट रूम्सचा अंतर्भावही करण्यात आला. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्सच्या वाढत्या प्रसारामुळे आणि अन्य अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने याहूच्या चॅट रूम्सना मिळणारा युजर्स आणि जाहिरातदारांचा प्रतिसादही रोडावला.
त्याचप्रमाणे या चॅट रूम्समध्ये काही चॅट रूम्स आणि युजर्स आक्षेपार्ह असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत गेल्याने याहूने चॅट रूम्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.