डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागेची औपचारिकता पूर्ण: मुख्यमंत्री

नवी दिल्ली: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा देण्याबाबत कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. मात्र जमिनीच्या हस्तांतरणाची कोणतीही ठोस तारीख देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

चव्हाण यांनी इंदू मिलच्या जागेसंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री आनंद शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मात्र ही जागा महाराष्ट्र शासनाकडे कधी हस्तांतरित करण्यात येईल; याची निश्चित तारीख अथवा कालावधी निश्चित झाली नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.

इंदू मिलची जागा डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळण्याबाबत रिपब्लिकन नेते व जनता आग्रही आहे. काही दिवसापूर्वी रिपब्लिकन पक्षाने संसदेसमोर उग्र निदर्शने केली होती. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत ६ डिसेंबरपर्यंत ही जागा ताब्यात न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

Leave a Comment