कंगनाला मेकअपसाठी लागतात १२ तास

अभिनेत्री कंगना गेल्या काही दिवसापासून भलतीच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच ती सिनेमा हिट करण्यासाठी नेहमीच नवीन आयडियाचा वापर करीत आहे. ती सध्या ‘रिवॉल्वर रानी’ या सिनेमाच्या शूटमध्ये बीजी आहे. या सिनेमातील तिचा रोल उठून दिसावा यासाठी सध्या ती मेकअपसाठी १२ तास घालवीत आहे. ती केवळ दोन दिवस मेकअपसाठी १२ तास घालवीत नाही तर दररोज तिला एवढा वेळ लागत असल्याचे समजते.

याबाबत बोलताना कंगना म्हणाली, ‘ मेकअपमुळेच ती गैंगस्टरच्या रोलमध्ये थोडीसी हटके दिसण्याचा प्रयत्न करीत आहे. नेहमीच परफेक्ट लुकमध्ये रोल करायला तीला आवडतो. माझ्या या मेकअपचा इतरांना त्रास होत नाही. हा रोल हटके असल्याने त्यासाठी मी सध्या खूप कष्ट घेत आहे.’

तसे पहिले तर परफेक्ट लुकसाठी बॉलीवूडमध्ये कंगनाची वेगळी ओळख आहे. कांगना नेहमीच मिळालेल्या रोलमध्ये मेकअप करून यशस्वी करण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. छोट्या सीनसाठी सुद्धा ती मेकअप करण्यास वेळ लावत असते. हा सिनेमा डायरेक्टर साई कबीर आणि निर्माता तिग्मांशु धूलिया दोघे मिळून निर्मिती करीत आहेत. कंगना करीत असलेला हा रोल सुरुवातीला अभिनेत्री तब्बूला ऑफर करण्यात आला होता. मात्र तिने हा रोल करण्यास नकार दर्शविल्याने कंगनाला हा रोल देण्यात आला असल्याचे समजते.