रिकी पॉंटिंगची जागा कोण घेणार ?

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने नुकतीच निवृती स्वीकारली होती. रिकीने १७ वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप देण्याची घोषणा केल्यानंतर आता त्याची जागा कोण घेणार याची चर्चा सर्वात सुरु आहे. पॉंटिंग हा दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पर्थ येथील शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर तो संघातून निवृत्त होईल.

सध्या ऑस्ट्रेलियन निवड समिती पुढे रिकीची जागा कोण घेणार यावरून चर्चा सुरु आहे. अजून तरी कोणाचे नाव पुढे आले नसले तरी सध्या विविध नावाची चाचपणी केली जात आहे. त्यामध्ये सध्या डावखुरा फलंदाज ख‍वाजा उस्मान याचे नाव सध्या आघाडीवर आहे. सध्या तो श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाण-या सामन्यात ऑस्ट्रेलिया अध्यक्ष एकादश संघाचे नेतृत्व करणार आहे. यापूर्वी जानेवारी २०११ साली झालेल्या अ‍शेज मालिकेत रिकी पॉंटिंग हा जखमी झाला होता. त्यावेळी त्याचा जागी खाव्जा उस्मान या युवा फलंदाजाने जागा घेतली होती.

आतापर्यंत मूळ पाकिस्तानी वशांचा असलेल्या खाव्जाने फक्त सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्याने सहा कसोटीत २६३ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. मात्र, सध्या तो ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी मजूबत दावेदार असल्याचे समजते. ऑस्ट्रेलियन संघात पॉंटिंग चौथ्या क्रमांकावर खेळत असल्याने त्याच्या जागी खाव्जाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment