कायदा हातात घेण्याची भाषा नको- मुख्यमंत्री

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद अस्तित्वात नाही आणि या मुद्द्यावरून कायदा हातात घेण्याची भाषा कोणी करू नये; अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेचे माजी सभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना दरडावले आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत शिवसैनिकांच्या भावना संवेदनशील असून कायदा स्मारक उभारणीच्या आड येत असेल तर शिवसैनिक कायदा हातात घेतील; अशी दर्पोक्ती जोशी यांनी केली आहे. त्याच प्रमाणे मराठी माणूसच बाळासाहेबांच्या स्मारकाला विरोध करीत आहे हे दुर्दैवी असल्याचे विधान करून जोशी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही वादात ओढले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मात्र जोशी यांच्या या विधानाचा कडक समाचार घेतला आहे. मनसेनेही बाळासाहेबांच्या स्मारकाचे शिवसेना राजकारण करीत असल्याचा आरोप करून जोशी यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Comment