बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज चाळीसी पुर्ण केली आहेत. त्याचा सोमवारी ४०वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जुनने ४० वर्ष पूर्ण करतांनाच सिनेमातील एक महत्वपूर्ण कारकीर्दीचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याने आतापर्यंत साकारलेल्या सिनेकारकीर्दीचा घेतलेला एक आढावा.
अर्जुन रामपालने केली चाळीसी पुर्ण
यापूर्वीच्या काळात राजनीति, ओम शांति ओम, रॉक ऑन अशा हिट सिनेमांमध्ये अर्जुनने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमात सर्व प्रकारच्या भूमिका सादर करताना त्याने अभियनयाने सर्वांनाच भुरळ घातली. आपल्या फिल्मी करिअरमध्ये अर्जुनने बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स केला आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘हिरोईन’ या सिनेमात अर्जुन रामपाल आणि करीना कपूर यांच्यतील भरपूर रोमान्स सीन्स पाहायला मिळाले. यापूर्वी अर्जुनने ‘दिल का रिश्ता’ या सिनेमात ऐश्वर्या रॉयबरोबर रोमान्स केला होता. त्यानंतर काही काळ अर्जुनने ‘चक्रव्यूह’ या सिनेमात काम केले होते. त्यामध्ये त्याने ईशा गुप्ताबरोबर रोमान्स केला होता.
‘राजनीति’ या सिनेमात अर्जुनने कतरिनाबरोबर श्रृती सेठबरोबरही इंटीमेट सीन दिला होता. त्यासोबतच ‘राजनीति’ या सिनेमात अर्जुन आणि कतरिना यांच्यात रोमान्स सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत. अर्जुनने वयाच्या ४० वर्षातच सर्व प्रकारच्या सिनेमात काम केल्याने अल्पवधीतच डोक्यावर घेतले आहे.
