इस्लामिक बँकींगला देशात परवानगी नाही- रिझर्व्ह बँक

नवी दिल्ली दि.२३ – इस्लामिक बँकींगला भारतात परवानगी देता येणार नाही असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी.सुब्बाराव यांनी स्पष्ट केले आहे. अरब देशात वा अन्य इस्लामी देशात कामानिमित्त वास्तव्य करणार्याी भारतीयांना किवा अनिवासी भारतीयांना देशातील आपापल्या राज्यात विकास कामात गुंतवणूक करायची इच्छा आहे मात्र त्यासाठी येणारे फंड हे इस्लामिक बॅकिंग मधून येऊ शकतात म्हणून या बँकींगला परवानगी द्यावी अशी मागणी केली जात होती त्याला उत्तर देताना सुब्बाराव बोलत होते.

ते म्हणाले की इस्लामिक बँकींग भारतात सुरू करण्यात कांही कायदेशीर अडचणी आहेत. मात्र अनिवासी भारतीयांचे फंडस भारतात आणण्यासाठी इस्लामी लॉ वर आधारित फंड चॅनलिंगच्या अन्य पर्यायांचा विचार करता येऊ शकेल पण इस्लामिक बॅकींग मात्र शक्य नाही. कारण अशी पद्धत सुरू करण्यासाठी स्वतंत्र इस्लामिक बँकींग कायदा गरजेचा आहे आणि सध्यातरी भारतात हा कायदा लागू होऊ शकत नाही.