रावळपिंडीत आत्मघातकी स्फोट

रावळपिंडी: येथील दर्ग्याजवळ तालिबान दहशतवाद्याने घडविलेल्या आत्मघातकी स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला तर ६८ जण जखमी झाले.

शहरातील शिया पंथीय धार्मिक कार्यक्रमासाठी दर्ग्यात प्रवेश करू पाहणाऱ्या तालिबान अतिरेक्याला भाविकांनी रोखले. यावेळी त्याने आपल्याजवळ असलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. रमझानच्या पवित्र महिन्यात दोन वेळा शिया पंथीयांना लक्ष्य करण्यात आले आले आहे.

या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारतानाच तालिबानने वारंवार असे हल्ले घडवून आणण्याची धमकीही दिली आहे.