अलाहाबादेत बाळासाहेबांचा अस्थिकलश अडविला

अलाहाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडविल्याने शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येठेल संगम तटावर जोरदार झटापट झाली.

शिवसेनाप्रमुखांच्या अस्थी देशातील प्रमुख नद्यांच्या पत्रात विसर्जित करण्यात येत आहेत. त्यानुसार येथील संगमावर अस्थिकलश घेऊन निघालेले खासदार चंद्रकांत खैरे उत्तरप्रदेश शिवसेनाप्रमुख उदयनाथ पांडे यांना सुभाष चौराहा (चौक) येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडविले. यावेळी शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. मात्र कालांतराने शिवसेनाप्रमुखांच्या अस्थी संगमावर विसर्जित करण्यात आल्या.

शिवसेनाप्रमुखांनी नेहमी उत्तरप्रदेशातून मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने उत्तरप्रदेशात त्यांच्याबद्दल राग आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतरही तो शांत झाला नसल्याचे या घटनेतून दिसून आले.

Leave a Comment