स्वीडनची इकेआ फर्निचर चेन भारतात

नवी दिल्ली दि.२१ – थेट परकीय गुंतवणुकीला भारत सरकारने परवागनी दिल्यानंतर स्वीडनच्या इकेआ या फर्निचर चेनने एफडीआय बोर्डापुढे मांडलेला प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे भारतात आपली ही चेन सुरू करण्याची सिद्धता केली आहे असे समजते. ही कंपनी भारतात १०,५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करत असून इतकी मोठी गुंतवणूक करणारी ही पहिली सिंगल ब्रँड कंपनी आहे. अर्थात या कंपनीला अजून कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सकडून हिैरवा कंदिल मिळणे बाकी असले तरी ती केवळ एक औपचारिकता असल्याचे तज्ञांचे मत आहे.

ही कंपनी भारतात आपली २५ दुकाने सुरू करणार असून पहिल्या टप्प्यात ४२०० कोटी रूपयांची तर दुसर्याी टप्प्यात ६३०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. टेकनॉपार्क अॅडव्हायझर्सचे अध्यक्ष अरविद सिघल यांच्या म्हणण्यानुसार ही कंपनी घरासाठी आणि कार्यालयांसाठीचे फर्निचर बाजारात आणेल तसेच रेस्टॉरंटस आणि फूड मार्टही सुरू करेल कारण या कंपनीच्या अन्य देशांत फर्निचर दुकानांच्या आवारात रेस्टॉरंट आणि फूड मार्ट शाखा आहेत तोच फॉर्म्युला भारतातही कायम राखला जाण्याची शक्यता आहे.

ब्रिटीश फूटवेअर रिटेलर्स पेव्हर्स लंडन यांनाही भारतात व्यवसायाची परवानगी देण्यात आली असून ५१ टक्के जॉईंट व्हेंचरमधील लक्झरी क्लोदिग कंपनी ब्रुक्स ब्रदर्स व इटालियन ज्युवेलरी मेकर दमियानी यांनाही भारतात व्यवसायाची परवानगी मिळाली असल्याचे समजते.