देवशी खंडुरीचा नवा अॅटमबॉम्ब

बॉलीवूडची फुलझडी देवशी खंडुरीने दिवाळी आधीच धमाका उडवून दिला आहे. तिने चक्क अंगवार फटाक्यांचीच वस्त्रे परिधान केली आहेत. ही बया एवढ्यावर न थांबता तिने बोल्ड फोटोशूटही केले.
प्रकाशाचा सण दिवाळी. दिवाळीत फटाके फोडले जातात. मात्र, देवशी खंडुरीने दिवाळी आधीच फटाके फोडले आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी देवशीने अगदी खास गिफ्ट तेही फटाक्यांच. ज्याचे नाव आहे ’देवशी बॉम्ब’. त्यासाठी तिने खास स्पेशल हॉट, बोल्ड आणि सिझलिंग फोटोशूट केले म्हणे.

देवशी फटाकडीने चक्क अंगावर दागिन्याप्रमाणे फटाके घातले होते. याबद्दल ही बी-टाऊनची रॉकेट बॉम्ब म्हणाली की, मला सरप्राइज द्यायला फारच आवडते. ते मला माझ्या चाहत्यांना आणि मित्रांना द्यायचे होत, असंच स्पेशल गिफ्ट.