चंदा कोचर प्रबळ महिलांच्या यादीत अव्वल

नवी दिल्ली दि.१६- आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर या सलग दुसर्या१ वर्षी व्यवसाय क्षेत्रातील सर्वात प्रबळ महिला ठरल्या आहेत. फॉर्च्यून मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत चंदा कोचर प्रथम स्थानावर असल्या तरी सर्वात हायेस्ट पेड महिला म्हणून भारतातील सन टिव्ही ग्रूपच्या कावेरी कालनिथी यांचा क्रमांक लागला आहे. पगाराच्या बाबतीत चंदा कोचर यांचे स्थान या यादीत आठव्या नंबरवर असून त्यांचा पगार आहे ४ कोटी २४ लाख रूपये.

कोचर यांच्यानंतर दुसर्याच व तिसर्याा क्रमांकावर अनुक्रमे टाफेच्या  मल्लीका श्रीनीवासन व कॅप जेमिनीच्या अरूणा जयंती यांचा नंबर आहे. र्फार्च्यूनने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ५० प्रबळ उद्योजक महिलांच्या यादीत सहा नवीन नावांचा समावेश आहे तर १९ जणींचे स्थान यादीत वधारले आहे. १७ जणींचे स्थान घसरले आहे. सहा नवीन नावात कोलगेटच्या प्रभा परमेश्वर, मॉर्गन स्टॅनले इंडियाच्या ऐशा सिक्वेरिया, इंटेल साऊथ च्या देवयानी घोष, डिअॅजियोच्या अवंती शंकरनारायणन, स्पेन्सर्स स्टुअर्टच्या अंजली बन्सल तर टपरवेअरच्या आशा गुप्ता यांचा समावेश आहे.

सर्वाधित पगार मिळविणार्याा कावेरी कालनिथी यांचा पगार गतवर्षीच्या ७२ कोटींवरून यंदा ५७ कोटींवर घसरला असला तरीही तो सर्वाधिक आहे. दुसर्याय नंबरवर पेनिन्सुला लँडच्या अध्यक्षा ऊर्वी पिरामल असून त्यांचे पॅकेज आहे ७.३ कोटी.

Leave a Comment