गुजराथ पुन्हा भाजपच्या छत्राखालीच – नरेंद्र मोदी

गुजराथेत दिवाळीनंतर साजर्याा केल्या जाणार्याे नववर्षाच्या शुभेच्छा गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजराथेतीलच नव्हे तर जगभरातील गुजराथींना दिल्या असून आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपलाच पुन्हा गुजराथची सत्ता मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजराथेत दिवाळी साजरी होत असतानाच २० डिसेंबरला पुन्हा दिवाळी साजरी होईल आणि ही दिवाळी लोकशाहीच्या विजयाची दिवाळी असेल असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

गेली ११ वर्षे गुजराथ प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही वाटचाल आणखी किमान पाच वर्षे तरी अशीच सुरू राहावी असे आवाहन करताना मोदी म्हणाले की राज्यात अंधाराचा प्रवेश होऊ देऊ नका. सौनो साय सौनो विकास म्हणजे सर्वजण एकत्र येऊ आणि सर्वांचाच विकास घडवू अशी या निमित्ताने शपथ घेऊ या. भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीच्या अंधःकारातून बाहेर पडण्याची गरज आहे.

मोदी यांनी राज्यपाल कमला यांनाही दिवाळीच्या शुभेच्या दिल्या आणि नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छा अहमदाबाद आणि गांधीनगर येथे स्वीकारल्या. गुजराथेत १३ आणि १७ डिसेंबरला विधानसभेसाठी मतदान होत असून निकाल २० डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

Leave a Comment