यंदाच्या वर्षी चीनची सोने आयात १ टक्कयाने वाढण्याची दाट शक्यता असून ही आयात ८५० टनांवर जाईल असे रॉयटर ग्लोबल गोल्ड फोरमने जाहीर केले आहे. त्यामुळे सोने आयातीत नंबर एक वर असलेल्या भारताचे स्थान यंदा चीन घेईल अशी लक्षणे दिसत आहेत. चीन केवळ सोने आयातीतच नाही तर दागिने आणि सोने गुंतवणूक यातही भारताच्या पुढे जाणार असल्याचे या फोरमचे म्हणणे आहे.
सोने आयातीत चीनची भारतावर मात
चीन सध्या जगातील सर्वात मोठे सोने मागणी असलेले आणि ज्युवेलरी माकर्ेट असलेले राष्ट्र बनले आहे. चीनमध्ये ज्युवेलरीसाठीची सोन्याची मागणी गतवर्षीच्या ५१५ टनांवरून ५२० टनांवर गेली आहे तर गुंतवणुकीसाठी असलेल्या सोन्याची मागणी २६५ टनांवरून २७० टनांवर गेली आहे.७० टन सोन्याचा वापर औद्योगिक क्षेत्रात केला गेला आहे. चीन तांबे, कोळसा, लोह या खनिजांचा आत्ताच जगातील पहिल्या क्रमांकाचा ग्राहक आहे.
विशेष म्हणजे चीन सोने उत्पादनातही जगात आघाडीवर असून २०११ सालात ३७१ टन सोने उत्पादन तेथे झाले आहे. तरीही आयातही वाढत असून ही आयात ग्राहकांची मागणी पुरी करण्यासाठी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. चीममध्ये ४० टक्के सोने हाँगकाँगमधून आयात केले जाते असेही समजते.
