शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा ‘जब तक है जान’ या दिवाळीत रिलीज होत आहे. या दिवाळीत शाहरुखचा मुकाबला केवळ अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाशी नाही तर बॉक्स ऑफिसवर ‘टाइगर’ झालेल्या सलमानशी आहे. सलमान खानच्या सिनेमाने २०० कोटीपेक्षा अधिक कमाई करून बॉलीवुडमध्ये हाहाकर माजविला आहे. किंग खानवर सध्या सलमानचे हे रेकॉर्ड तोडून बॉलीवुडमध्ये पुन्हा बादशाही दाखवण्याची संधी आहे.
शाहरुखचा मुकाबला टायगरसोबत
सलमानच्या ‘एक था टाइगर’ ने रिलीज होऊन महिना उलटल्यानंतर नवीन नवीन रेकॉर्ड तयार केले आहेत. मोबाइल फोनवर खूप वेळेपर्यंत आणि सर्वात अधिक चालणारा सिनेमा अशी ओळख झाली आहे. या सिनेमाने पाहिल्याच दिवशी बॉक्स आफिसवर ३३ कोटीची कमाई केली होती. कबीर खानने डायरेक्टर केलेल्या ‘एक था टाइगर’ या सिनेमाची वीडीओ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक युवकानी युट्बवर पहिला आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘एक था टाइगर’ ने २१० कोटींचा आकडा पार केला आहे. त्याशिवाय अजय देवगनचा ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाची टक्कर शाहरुखशी होत आहे. शाहरुख खूप दिवसानंतर रोमांटिक सिनेमा करीत आहे. त्यामध्ये कटरीना आणि अनुष्का त्याच्यासोबत काम करीत आहेत. तर दुसरीकडे अजयने ‘सन ऑफ सरदार’ मध्ये सलमान व संजय दत्तला एन्ट्री दिली आहे. ‘सन ऑफ सरदार’ मध्ये संजय दत्त मुख्य रोल करीत आहे तर सलमान आइटम नंबर करणार आहे. त्यामुळे हा मुकाबला तगडा होणार असे दिसत आहे. हा चक्रव्यूह सलमानने रचला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवाळीतच शाहरुखचा रोमांस भारी पडणार की अजय देवगन आणि सोनाक्षीचा ‘सन ऑफ सरदार’ समजणार आहे.
