साईनाला सपाची उमेदवारी?

अलिगढ दि. ५ – उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे अध्यक्ष व एकेकाळचे पैलवान मुलायमसिंग यांनी बॅटमिंटन पटू साईना नेहवाल हिला आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट देण्याची तयारी दर्शविली आहे. अलिगढ येथील एका खासगी विद्यापीठाच्या समारंभात बोलताना ही घोषणा करून मुलायमसिंग यांनी उपस्थितांना चकीत केले.

मुलायमसिंग म्हणाले साईनाला जर राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आपली पार्टी तिला उमेदवारी देईल. तिची इच्छा असेल तर अलिगढमधूही तिला उमेदवारी देण्याची आमची तयारी आहे. मुलायमसिंग यांच्या घोषणेने त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांसह उत्तर प्रदेश राजकारण क्षेत्रातही खळबळ उडाली असल्याचे समजते.

मुलायम सिंग यांचे कुस्तीप्रेम जगजाहीर आहे. ते सत्तेवर असताना अनेक कुस्तीपटूंचा त्यांनी वेळोवेळी सन्मान केला आहे. त्याचवेळी राजकारणात नसलेले पण अन्य क्षेत्रात नामवंत असलेल्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठीही त्यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. चित्रपट अभिनेत्री जयाप्रदा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता कुस्तीशिवाय अन्य खेळांत प्रावीण्य दाखविणार्यांजनाही मुलायमसिंग यांच्याकडून पसंती दिली जात आहे असे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment